Author: Sharad Pawar
Publication: Rajhans Prakashan
View DetailsAuthor: Dr.Arun Gadre
Publication: Rajhans Prakashan
Category: चरित्र
Qty:
ते फक्त धर्मप्रसारासाठी आलेले मिशनरी नव्हते. अन् रूढार्थानं त्यांचा धर्मही चर्चच्या चार भिंतीत बंदिस्त नव्हता. म्हणूनच भारता आल्यावर ते भारताचे बनले. भारतीय लिपींमधून मुद्रण करण्यासाठी त्यांनी त्या त्या लिपीचे खिळे बनवले. रामायण, सांख्य तत्त्वज्ञान अन अनेक संस्कृत ग्रंथांचं इंग्रजीत भाषांतर केलं. सतीबंदीचा कायदा करण्यासाठी पुढाकार घेतला. मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या तत्त्वाचा पुरस्कार केला, त्यासाठी बंगाली भाषेतून शिक्षण देणारं कॉलेज काढलं. आणि हे सारं करता करता भारतही त्यांच्यात भिनला. त्यांनी भारतावर अन् भारतानं त्यांच्यावर ठसा उमटवला. त्यांच्या कर्तृत्वाचं, भारतप्रेमाचं सुंदर प्रतीक म्हणजे भारतीय टपालखात्यानं त्यांच्या जन्मदिनाची द्विशताब्दी साजरी करताना काढलेलं विशेष तिकीट. इथल्या मातीत रुजलेल्या, इथल्या जानपदात रमलेल्या पण वर्तमानाल फारीश ओळ नसलेल्या एका कर्तृत्ववान महामानवाची प्रेरक चरितकहाणी-